काम अंतिम टप्प्यात आलेले असताना ‘या’ कारणामुळे पूल पाडण्याची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असताना, अंतिम टप्प्यात पुरातत्त्व खात्याची भूमिका जनताविरोधी आहे. या खात्याचा आदेश झुगारून पुलाचे काम पूर्ण केले जाईल. काम बंद पाडल्यास पुलाच्या बांधकाम पूर्ततेसाठी प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भर उन्हात शिवाजी पुलाजवळ ही बैठक झाली.

दरम्यान, पर्यायी पूल हा जनतेच्या सोयीसाठी आहे. जनतेची गैरसोय करून कोणी काम थांबविल्यास कोल्हापुरी हिसका दाखविण्यात येईल, वेळ पडल्यास आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा महापौर सौ. सरिता मोरे यांनी रणरणत्या उन्हात झालेल्या बैठकीत दिला.

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असताना, अंतिम टप्प्यात पुरातत्त्व खात्याची भूमिका जनताविरोधी आहे. या खात्याचा आदेश झुगारून पुलाचे काम पूर्ण केले जाईल. काम बंद पाडल्यास पुलाच्या बांधकाम पूर्ततेसाठी प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भर उन्हात शिवाजी पुलाजवळ ही बैठक झाली.

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, पर्यायी पुलाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत. 80 टक्के काम झाले असताना ठेकेदाराने काम बंद केले. कृती समितीच्या आंदोलनाने काम सुरू झाले असून, आता 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. असे असताना ‘पुरातत्त्व’ने नोटीस देणे निषेधार्ह बाब आहे. ज्या दिवशी काम बंद करतील अथवा पूल पाडण्यास येतील, त्या दिवशी कोल्हापूर बंद ठेवून निषेध करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय कृती समिती स्वस्थ बसणार नाही. काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पुलाच्या कामात अडथळा आणणार्‍यांचे तंगडे मोडल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर शिवाजी पुलावरून होणारी वाहतूकही बंद केली जाईल.

कृती समितीचे सहनिमंत्रक बाबा पार्टे म्हणाले, पर्यायी पुलाच्या कामात अनेक अडचणी आल्या. मात्र, कृती समितीने जनरेट्याद्वारे काम सुरू ठेवले आहे. यापूर्वी झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत पुरातत्त्व विभागाचे विजय चव्हाण यांनी पुलाच्या कामात अडथळा येणार नाही, अशी ग्वाही दिली असताना पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना नोटीस का? हे सामाजिक काम आहे. या कामात अडथळा आणल्यास अथवा आडवे येणार्‍यास आडवे केल्याशिवाय राहणार नाही. काम पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. यावेळी फत्तेसिंह सावंत यांनी खासदार संभाजीराजे यांचे पत्र दाखवून कृती समितीसोबत खासदार आहेत, अशी ग्वाही दिली.

Leave a Comment