Shivajinagar-Hinjawadi Metro : शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रोची ट्रायल यशस्वी!! प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Shivajinagar-Hinjawadi Metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shivajinagar-Hinjawadi Metro। बहुचर्चित असलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो प्रकल्पाची काल चाचणी पार पडली. गेल्या अनेक वर्षापासून मेट्रोचे काम चालू होते. अनेक अडथळे पार करत अखेर पुणे मेट्रोचे काम अखेर पुर्न्त्तावाकडे गेले आहे. ,म्हणजेच “शहराच्या आयटी हबला मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्ग ३ च्या बांधकामात पहिला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. काल ४ जुलै २०२५ रोजी, मान डेपो आणि पीएमआर-४ स्टेशन दरम्यान मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली,” पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे पुण्याची वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धतीतून राबविला जात आहे आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या नावाने टाटा आणि सीमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे विकसित केला जात आहे.

२३.३ किमी लांबी- Shivajinagar-Hinjawadi Metro

साधारणतः हा प्रकल्प (Shivajinagar-Hinjawadi Metro) सुमारे “२३.३ किमी लांबीचा हा पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्ग २३ स्थानकांसह बांधला जात आहे आणि प्रकल्पाची एकूण प्रगती ८७% झाली आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे आणि हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, त्याचाच भाग म्हणून काल या प्रकल्पाची चाचणी देखील झाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितले की काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे आणि मार्च २०२६ पर्यंत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार आहे. मार्च २०२६ ला हा जनेतेच्या सवेत असेल असं पीएमआरडीए सांगितले आहे. या मार्गासाठी, ४ वातानुकूलित मेट्रो ट्रेन संच पुण्यात आले आहेत, प्रत्येक ट्रेनमध्ये ३ कोच आहेत आणि एकूण १००० प्रवाशांची क्षमता आहे. या मेट्रो गाड्यांचा वेग ताशी ८० किमी असेल. Shivajinagar-Hinjawadi Metro

पुण्यातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. त्याला एक चांगल पर्याय म्हणून पुण्यात मेट्रोची निर्मिती झाली. मेट्रो मुळे पुणेकरांचा प्रवास तर सोप्पा झालाच आहे आणि त्यांचा वेळही वाचतोय. महत्वाची बाब म्हणजे पुणे मेट्रो मुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण ही कमी होत आहे . पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण 40 लाख 42 हजार 659 इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे पुण्यातील रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी बघायला मिळते… याच्यावर उपाय म्हणून पुणे मेट्रो कडे अनेक प्रवासी वळत आहेत.