महाविकास आघाडी 2009 मध्ये होणार होती; आढळराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. जी महाविकास आघाडी २०१९ ला झाली ती महाविकास आघाडी २००९ लाच होणार होती पण ती फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामुळे आडून राहिली अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली. शिरूर येथील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली असे मला सांगण्यात आले होते. शरद पवार याना स्वतः शिरूर मतदारसंघातून लोकसभा लढवायची होती. त्यामुळे संजय राऊत यांनी मला मावळ मधून निवडणूक लढवायला सांगितलं. शरद पवारांनीही मला त्याच वेळी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती. मात्र मी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला. नाहीतर तेव्हाच महाविकासआघाडी झाली असती.

शिवसेनेत बंडाळी होऊनही मी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहायचं ठरवलं होत. मी त्यांना म्हंटल इथून पुढे आपण काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडू आणि स्वबळावर लढू, तर ते नाही म्हणाले. आपल्याला राष्ट्रवादीशी जुळवून घ्यावं लागेल. शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही पुणे लोकसभेसाठी तयारी करा. त्यानंतर मी संजय राऊतांना फोन केला. तर ते म्हणाले तुम्हाला एकदा सांगितलंय ना? असं म्हणताच मी फोन ठेऊन दिला, असं आढळराव पाटलांनी सांगितलं.

Leave a Comment