शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नेमबाज वेदांगी तुळजापूरकरला जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली  आहे.राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नेमबाज वेदांगी तुळजापूरकरला जाहीर झाला आहे.

18 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वेदांगी अंजली भागवत शुटिंग अकादमीची शूटर असून तिने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल या पुरस्काराने घेतली आहे. मुंबईत राहणारी वेदांगी पुणे येथे अंजली भागवत अकादमीत सराव करते. वकिली पेशा सांभाळत तिने हे यश मिळवले आहे.विविध खेळांतील 25 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांगीचा  सराव पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी केंद्रावर सुरू असतो. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बोलताना त्यांचे सहकारी राष्ट्रीय नेमबाज पृथ्वीराज माने देशमुख म्हणाले की “आमच्या अकादमी मधील खेळाडूस हा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण संघामध्ये आनंदाचं वातावरण आहे. ती फार शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे. तिच्या आणि आमच्या गुरु अंजली भागवत यांच्या मेहनतीचं फळ हे या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं आहे.

 कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Leave a Comment