Thursday, February 2, 2023

“मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल” – शिवेंद्रराजे भोसले

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते तर कधी एकमेकांबद्दल प्रेमही दर्शवले जाते. असा प्रकार अनेकदा सातारचे भाजपचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबतीत बघायला मिळतो. दरम्यान आज व्हेलेंटाईन डे निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. “आज व्हेलेंटाईन डे आहे. मला नेहमी उदयनराजे त्याच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात. मला त्यांना आय लव्ह यु म्हणायचे असेल तर अगोदर त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु असा संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज व्हेलेंटाईन डेही आहे. या दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांना जर प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल तर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे नाही. ते नेहमी मला त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात. आता तर माझ्याकडे त्यांच्या ड्रॉयव्हरचाही फोन नंबर नाही. मला त्यांना जर आय लव्ह यु पाठवायचे असेल तर अगोदर त्यांच्या ड्रायव्हरला आय लव्ह यु पाठवावे लागे, असे भोसले यांनी म्हंटले.

आज व्हेलेंटाईन डे असल्यामुळ राजकीय नेते मंडळींकडूनही या डे निमित्त एकमेकांनाप्रेमाचे संदेश पाठविले जातायंत. दरम्यान खास करून सातारा जिल्ह्यात दोन्ही राजेंच्या प्रेमाची जास्त चर्चा होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील एकमेकांवर असलेले परम हे सर्वांनाच माहिती आहे. आज व्हेलेंटाईन डे निमित्तही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपले बंधू उदयनराजे भोसले यांच्याविषयी आपल्या शैलीत प्रेम व्यक्त केले आहे.