मागच्या दाराने जाऊन तुम्ही राज्यसभेत खासदार म्हणून बसला; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात पालिकेच्या निवडणुका जवळ येताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू झाली असून यामध्ये सातारकरांची चांगलीच करमणूक होत आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रराजेंच जस वय वाढतय तशी त्यांची बुद्धी कमी होत असल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली होती याला आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे.

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, खासदारांची बुद्धी अचाट आणि अफाट आहे, त्यांच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम बघितले तर लोकांमधून निवडून आलेले आता आपली बुद्धी वापरून राज्यसभेत बसलेत , जिथं तुम्ही पुढच्या दाराने जाऊन बसला होता तिथं तुम्ही आता मागच्या दाराने जाऊन बसला असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली आहे.

तुमची बुद्धी एवढी मोठी आहे तर मग जिल्हा बँक निवडणुकीत संचालक पदासाठी एवढ्या सर्वांचे उंबरठे का झिजवावे लागले. एवढं तुमचं आहे तर मग डब्बे का द्यावे लागले.रामराजें कडे गेले, मकरंद पाटलांकडे गेले, बाळासाहेब पाटलांकडे गेले, शशिकांत शिंदेंच्या हातात डब्बा दिला.मग येवढे डब्बे पोच करण्याची गरज काय होती असा सवाल यावेळी शिवेंद्रराजे यांनी केला. तसेच एकदा बिनविरोध झाले की परत हे गायबच झाले असेही शिवेंद्रराजे यांनी म्हंटल.

Leave a Comment