‘त्या’ प्रकरणातून शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता, वाई न्यायालयाने दिला निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दि.18 डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवलकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन सबळ पुराव्या अभावी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता झाली.

वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्यावतीने न्यायालयात बाजू ॲड.शिवराज धनवडे, ॲड.आर.डी. साळुंखे, ॲड.संग्राम मुंढेकर, ॲड.प्रसाद जोशी तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड.मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.
महामार्गावर पडलेले खड्डे, टोल नाक्यावर होत असलेली गैरव्यवस्था यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आक्रमक होऊन दि.18 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू होता. भुईंज पोलीस ठाण्याचे पो.कॉ.धनाजी कदम यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याची फिर्याद दाखल केली होती.

त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जितेंद्र सावंत, फिरोज पठाण, मिलिंद कदम,सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासिर शेख, अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम,अमोल मोहिते हजर झाले. दुपारी न्यायाधीश गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत सबळ पुरावेच नसल्याने सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment