सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्यांची प्रकृती स्थिर झाली. सकाळी प्रकृतीच्या संदर्भाने आणखी चाचण्या करण्यासाठी ते स्वतः मुंबईला गेले.
रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातमीने कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधूक वाढली होती. प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे ही रात्री उशिरा पुण्याहून त्यांना भेटायला आले. शिवेंद्रराजे यांच्या प्रकृतीच्या बातमीने ते अस्वस्थ होते. शिवेंद्रराजे यांना पाहिल्यानंतर मात्र त्यांना हायसे वाटले. दोघेही यावेळी दिलखुलास बोलले. उदयनराजे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्यानंतर उदयनराजे तेथून निघून गेले.
संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे बुधवारी सकाळी स्वतःहून मुंबईला गेले. मी सुखरूप असून कुणीही चिंता करू नये, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.