मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे – शिवेंद्रराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत असल्याची भावना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही भूमिका मांडली

मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं नेहमी बोललं जातं. मराठा समाजातील असलेल्या दुफळी असल्यामुळे असं बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्रं आलं पाहिजे, असं सांगतानाच मी इथे राजे किंवा आमदार म्हणून आलो नाही. तर एक मराठा म्हणून या गोलमेज परिषदेला उपस्थित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, असं सांगतानाच आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालण्याची मागणीही केली

ज्यांना आरक्षणाविषयी न्यान आहे त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून येथे आलो नसून मराठा म्हणून येथे आलो आहे. इतर समाजातील आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी नसून आमचे आहे तेच आम्हाला द्या. असे मत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment