सालाबादप्रमाणे “वंदेमातरम् व्यायाम मंडळ ” यांच्यावतीने राजवाडा चौक, येथे मोठ्या थाटामाटात “वंदेमातरम् शिवोत्सव – २०१९” ची सुरुवात नितीन शिंदे व नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की, आता शिवजयंती दिल्लीत साजरी होत आहे, आता यापुढे पाकिस्तानात शिवजयंती साजरी करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे .शिवजयंतीचे तीन तुकडे आम्हाला मान्य नाहीत. राज्यात, देशात तिथीनुसार एकच जयंती झाली पाहिजे. यावेळी नगरसेविका सुनंदा राऊत, आदित्य पटवर्धन, अमर पडळकर, प्रसाद रिसवडे, प्रकाश बिरजे, पृथ्वीराज पाटील, प्राची कुदळे, लीनाताई सावर्डेकर, सुनिताताई इनामदार, पै. प्रदिप निकम, चेतन भोसले, गजानन मोरे, स्वप्निल कुंभोजकर आदिंसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.