शिवजयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी वाहिली अनोखी आदरांजली; ‘मोडी’ लिपी मध्ये लिहिले संपूर्ण शिवचरित्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित्त मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला. या अभिनव उपक्रमामुळे मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

गरवारे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले.

या भित्तीपत्रिकेला ‘शिवस्मरण‘ असे समर्पक नावही देण्यात आले. मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षा बिराजदार, वेदिका कुष्ठे, गिरीजा फडणीस, सीमा इंदलकर, ऐश्वर्या डिसले, वैशाली कुलकर्णी, प्रियांका कांबळे, ऋजुता देसाई, अस्मिता शेवाळे, श्रीया कोल्हटकर या विद्यार्थिनींनी हे मोडी लिपीतील लेख लिहीले. विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे ‘शिवस्मरण‘ छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment