सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यतारा येथे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निषेध नोंदवण्यासाठी आज दोन शिवप्रेमी युवकांनी अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. किल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. निधी मंजूर असून देखील याकडे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यां कडून दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांचा आंदोलन करत निषेध नोंदवला आहे.
सातारा शहरापासून काय अंतरावर असलेल्या अजिंक्यतारा किल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्या खड्यातील दगडही वरती आले आहे. परिणामाची वाहनधारकांना व नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. तर खड्यांमुळे वाहनाचेही नुकसान होत आहे. किल्ह्यावरील रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात शिवप्रेमी गणेश अहिवळेयांच्यासह काही युवकांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदनेही दिली.
मात्र, त्यांच्याकडून नुसती आश्वासने देण्यात येत असल्यामुळे याचा निषेद नोंदवण्यासाठी आज युवकांनी अजिंक्यतारा किल्यावरील रस्त्यावर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. वारंवार मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाकडून आम्ही दिलेल्या निवेदनांवर खोटे बोलून पलटी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमही लोटांगण घातले आहे. आता लोटांगण घालून देखील जर रस्ता होत नसेल तर आता आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा आंदोलनकर्ते शिवप्रेमींनी दिला आहे.
यावेळी आंदोलनकर्ते गणेश अहिवळे म्हणाले की, किल्ले अजिंक्यतारा हि राजधानी आहे. मात्र, या राजधानीकडे जाण्यासाठी उत्तम अशा प्रकारचा रस्ता होणे गरजेचे आहे. मात्र तो नाही. आज महाराष्ट्रातील इतर गड, किल्ह्यांकडे जाण्यासाठी उत्तम अशा प्रकारचे रस्ते तयार करण्यात आलेले नाही. मात्र, सातारा येथील अजिंक्यतारा किल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात आज शिवप्रेमींनी अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाची सातारा शहरांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.