अखेर महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे दाखल; जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता??

waghnakhe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज म्हणजेच 17 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) वाघनखे (Waghanakhe)लंडनहून मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली आहेत. येत्या 19 जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला या वाघनख्यांचे साताऱ्यात (Satara) दिमाखात स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष अशी तयारी आणि बंदोबस्त करण्यात आला आहे. या वाघनख्यांच्या स्वागतावेळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे.

यावेळेत येणार पाहता वाघनखे

महत्वाचे म्हणजे, 19 जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवभक्तांना पाहण्यासाठी ही वाघनखे खुली करण्यात येतील. ज्याठिकाणी ही वाघनखे ठेवली जातील तेथे बुलेट प्रूफ कवच करण्यात आले आहे. तसेच या काळामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील संग्रहालयामध्ये राहील. साताऱ्यातील दररोज प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यासाठी निशुल्क सोडण्यात येईल. तर इतर लोकांना 10 प्रमाणे तिकीट आकारले जाईल. ही वाघनखे सकाळी 10 ते 5 या वेळेत संग्रहालयामध्ये जाऊन पाहता येतील.