हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shivraj Patil Chakurkar Passed Away । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे आज निधन झालं आहे. आज सकाळी ६:३० वाजता त्यांनी लातूर येथील त्यांच्या “देवावर” या निवासस्थानी शिवराज पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय ९१ वर्ष होते . मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. शिवराज पाटील चाकुरकर हे काँग्रेसचे बडे नेते होते, देशाच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता.
लातूर लोकसभेत ७ वेळा विजय – Shivraj Patil Chakurkar Passed Away
शिवराज पाटील हे लातूरमधील चाकुर येथून प्रभावी काँग्रेस नेते होते . त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. शिवराज पाटील चाकुरकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. १९९१ ते १९९६ पर्यंत त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी देशांतर्गत आणि परदेशात अनेक संसदीय परिषदांमध्ये भारताचे नेतृत्व केले. २००४ मध्ये निवडणूक पराभूत होऊनही त्यांना केंद्रात गृहमंत्रीपद देण्यात आले होते, यातूनच दिल्ली दरबारी त्यांचं असलेले महत्व स्पष्ट होते. Shivraj Patil Chakurkar Passed Away
काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर शिवराज पाटील चाकूरकर याना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी गृहमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली. भारतीय लोकशाही व्यवस्थेला शांत,संयमी नेतृत्व प्रदान करणारे आदरणीय श्री. शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे निधन अत्यंत दु:खद घटना आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणातील एक सुसंस्कृत व मूल्यनिष्ठ अध्याय समाप्त झाला आहे. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. संसदेत त्यांच्या वागणुकीत आणि विचारमंथनात एक आदर्श राजकीय संस्कृतीचे दर्शन घडत असे.त्यांच्या जाण्याने सुसंस्कारित आणि राष्ट्रीय हिताचा विचार अग्रस्थानी ठेवणारा नेता गमावला आहे; या कठीण प्रसंगी चाकूरकर कुटूंबियांच्या दु:खात मी सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो ही प्रार्थना! अशी पोस्ट धीरज देशमुख यांनी केली.




