अशोक चव्हाणांना विश्वासघातकी पुरस्कार देणार; विनायक मेटेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून निशाणा साधला जात असताना इतर संघटनांकडूनही हल्लाबोल केला जात आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार व काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्याकडून फसवणूक केली जात असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी आज झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार देणार असल्याचा टोला लगावला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला राज्यभरातील 24 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शिवसंग्राम सन्घटनेचे नेते विनायक मेटे यांनी निशाणा साधला. “काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे उपसमितीचे अध्यक्ष असूनही मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मेटे यांनी केली.

यावेळी मेटे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उद्या सकाळी 10 वाजता भेट घेणार आहोत. या भेटीवेळी राज्य सरकार जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. या सरकारला त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत जाब विचारावा आणि ओबीसी आयोग बरखास्त करावा, अशी मागणीही करणार असल्याची माहिती मेटे यांनी यावेळी दिली.

Leave a Comment