Wednesday, October 5, 2022

Buy now

शिवसैनिक आक्रमक!! बंडखोर आ. तानाजी सावंत यांना गद्दार म्हणत कार्यालयाची तोडफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांकडून फोडण्यात आले आहे.

गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे. इथून पुढे संपूर्णमहाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन करत गद्दाराना अद्दल घडवली जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. तानाजी सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे गटाकडून थेट शिवसेनेवर च दावा ठोकला जातोय. आमचा गट हीच खरी शिवसेना अस शिंदे गटाचे म्हणणं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.