हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तयारीला लागली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला असून, मविआचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शनही करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या कि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असतील. परंतु मुख्यमंत्री मात्र विधानसभा निकालानंतर ठरवलं जाईल… नेमकं याच मुद्यावरून एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याना पत्र लिहून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव साहेबाना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देण्यात येत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे अशी शंका सदर शिवसैनिकाने व्यक्त केली आहे.
काय हे सदर पत्रात ?
मिलिंद भाई,
जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.
लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील… मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी…. असं या पत्रात म्हंटल आहे. या पत्रामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आलाय.