15 फेब्रुवारीला शिवसेनेची पत्रकार परिषद, सर्व आरोपांना प्रत्युत्तर देणार- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने कोविड सेंटरच्या घोटाळ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता 15 फेब्रुवारी ला शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून याबाबत सर्व आरोपांना उत्तर देईल अस म्हंटल आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. कोविड सेंटर मध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. कोरोना काळात राज्य सरकारने चांगल काम केलं. मुख्यमंत्र्यांचे अनेकदा कौतूकही झालं. त्याउलट उत्तरप्रदेशात हजारो मृतदेह गंगेत गेले, त्यामुळे कोणाला जर भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर त्यांनी त्या फायली घेऊन उत्तरप्रदेशात जावा…अस संजय राऊत यांनी सांगितले

काही लोकांना भुंकायची सवय असते, कोणाला किती भुंकायच ते भुंकू द्या. याबाबत 15 फेब्रुवारी ला 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. तोपर्यंत कोणाला किती फायली काढायच्या ते काढू द्या, आम्ही कोणाला घाबरत नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे सोमय्यांचा आरोप-
पुण्यातील कोव्हिड सेंटरंच कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा नवा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप केला अस त्यांनी म्हंटल. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट चहा विकणाऱ्या राजीव साळुंखे यांच्या न्यू लाईफ कंपनीला देण्यात आले. फक्त १ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १०० कोटी रुपयांचे कंत्राट कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment