Wednesday, March 29, 2023

युती बाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | युती बाबत अंतिम बोलणी झाली आहेत अशा बातम्या येऊ लागल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेत उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणी लोकसभा निवडणुकीसाठीच झाली आहेत. ५०-५० टक्के जाग्यांवर आम्ही लढणार आहे हि माध्यमांनी उठवलेली बातमी आहे. वास्तवात आमच्यात जे जागा वाटप झाले आहे. त्यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्वांना कळवू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेअंती काल रात्री युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यात शिवसेनेला १२६ जागा तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला १६२ जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांना देखील मान्य झाला आहे. अशा आशयाच्या बातम्या सकाळपासून माध्यमात झळकत होत्या. त्यातील हवा काढून टाकण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेने युतीचा सस्पेन्स वाढला आहे.

- Advertisement -

नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण बहुमत नसताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चालवून दाखवले असे विधान केले. त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेने राजीनामा देऊ असे म्हणले मात्र कधी राजीनामे दिले नाहीत. ना सरकराचा पाठिंबा काढून घेतला. आम्हाला महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायचे होते. म्हणून आम्ही सरकारचा पाठिंबा काढला नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.