एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प का बसले आहेत ?? सामनातून भाजपला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं होत. त्यावर आता शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली असून भाजपवर ही निशाणा साधण्यात आलाय.

आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. पाशवी बहुमत, जोर जबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे?’ असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.

शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?’ असा थेट सवाल करत सेनेनं भाजपला फटकारले आहे.

Leave a Comment