अक्षयकुमार – योगी भेटीनंतर शिवसेनेचा अक्षयकुमारला खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यूपीत फिल्म सिटी उभारण्याचा चंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला आहे. त्याची तयारीही सुरू झाली असून मुंबईतील सिनेसृष्टीतील मंडळींशी याबाबत चर्चा करण्यासाठी योगी मुंबईत आले आहेत. योगी आदित्यनाथ मुंबईत येताच त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमारच्या या भेटीनंतर फिल्मसिटी मुंबई बाहेर नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवरून शिवसेनेनं अक्षयकुमारला टोला हाणला आहे.

अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते,’ अशी खोचक टिप्पणी शिवसेनेनं केली आहे.

राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांशी अक्षयकुमारची जवळीक आहे. त्यात अनेक पक्षातील लोक असले तरी भाजपमधील नेत्यांसोबत अक्षय अनेकदा दिसला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अक्षयकुमारनं पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली होती. राजकारणा पलीकडचे मोदी हा त्या मुलाखतीचा विषय होता. त्यात त्यानं मोदींना त्यांच्या आवडीनिवडींविषयी विचारले होते. त्यावेळी मोदी यांनी मला आंबे खूप आवडतात, असं म्हटलं होतं. त्यावरून त्यावेळी खमंग चर्चा रंगली होती. योगी व अक्षयकुमार यांच्या भेटीच्या निमित्तानं पुन्हा ती आठवण काढत शिवसेनेनं टोला हाणला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like