भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे वळवळ करु नये ; औरंगाबाद नामकरणावरून शिवसेनेचे भाजपला खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने यासाठी विरोध केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. यास प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ पाकिस्तानात मंदिराची तोडफोड सुरू आहे तिथं एखादा सर्जिकल स्ट्राईकचा फुगा फोडता येईल का बघावे असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली.

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बिघाडी होईल असे समजणे चुकीचं असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. ‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे,’ असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असे स्पष्टीकरण शिवसेनेने आपल्या मुखपपत्रातून दिलं

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये,’  असे म्हणत शिवसेनेने भाजपला धारेवर धरलं.

औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.भारतीय जनता पक्षाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील असाच समज यामुळे मराठी जनतेचा होईल, पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका! महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? असा थेट सवाल शिवसेनेने भाजपला केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment