बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पवारांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शरद पवार मोठे मराठा नेते आहेत. आमचे लोकनेते आहेत. बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार आहे. मी मुंबादेवी, महालक्ष्मीचरणी आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की पवार साहेबांना लवकर बरं होऊ देत. ते लवकरच पुन्हा बरे होतील आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सक्रीय होतील”

शरद पवार यांना रविवारी सांयकाळी पोटात दुखू लागल्यानं अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचं निदान झालं आहे. शरद पवार यांच्यावर 31 मार्चला एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment