उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायला निमंत्रणाचा गरज नाही; संजय राऊतांचा भाजपाला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना छेडले असता, ” उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचं म्हणतं.अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, असं राऊत म्हणाले.

”अयोध्या आणि शिवसेनेचं नातं अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नातं नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येला जाण्याचं निमंत्रण मिळालं आहे. चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने का होईना ते अयोध्येला जातील. आम्ही अयोध्येत नेहमीच जातो, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाला लगवला. दरम्यान, अयोध्येप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं. देशातील डॉक्टर, पोलीस, नर्स आणि वॉर्ड बॉय हे कोरोनाशी लढत आहेत. बलिदान देत आहेत. आपल्या सर्वांवर देवाचेच आशीर्वाद आहेत, असं सांगत राऊत यांनी या प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं.

राम मंदिर भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मंदिर ट्रस्टच्या बैठकीनंतर दोन तारखा निवडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ ऑगस्ट ही तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment