किरण माने हे उत्तम वक्ता, त्यांनी राजकारणात प्रवेश करावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राज्यात राजकारण तापलं. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद याना विचारले असता त्यांनी किरण माने यांना राजकारण प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.

एखाद्या व्यक्ती ने कोणती भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकने आणि चुकीच्या बातम्या बाहेर पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. आपले मुद्दे मांडण्याची कला त्यांना अवगत आहे, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे दिपाली सय्यद यांनी म्हंटल.

दरम्यान, मालिकेतून बाहेर काढल्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार साहेब आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.