मुंबई । राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुशिक्षित राजकारण्यांची बोंब आहे. मात्र, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आले असता शिंदे यांनीच ते पास झाल्याची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.
”सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. माझा मुलगा आणि खासदार श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो,” असं शिंदे म्हणाले. (shivsena leader eknath shinde passed BA final year exam from ycmou)
'लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे'; खडसेंचे चॅलेंज
वाचा सविस्तर-👉 https://t.co/xgR6aVwjDk#HelloMaharashtra @EknathGKhadse @PrasadLadInd @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
समजूत घातली तरी 'ते' पक्ष सोडून गेले, पण आता…., जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडल्यावर पंकजांची प्रतिक्रिया
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ENKNBwMGR9@Pankajamunde @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
भाजपला जास्त मस्ती आली आहे, त्यांना धडा शिकवणारचं; जयसिंगराव गायकवाडांचा निर्धार
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/TvMKZw5cKz@BJP4Maharashtra @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in