संजय राऊतांच्या घरी लगीनघाई,राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत ‘भन्नाट’ डान्स; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह सोमवारी 29 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरत भन्नाट डान्स केला आहे. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी होणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनीही उपस्थिती लावली.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सहकुटूंब या कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी सुळे यांनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत देखील उपस्थित होत्या. संगीत कार्यक्रमात राऊत व सुळे यांनी केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.

Leave a Comment