”आम्ही शहीद होऊ पण भाजपसमोर गुडघे टेकणार नाही” संजय राऊतांचा एल्गार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । “शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासारख्या शिवसेनेच्या प्रवक्ते-नेते- आमदार-खासदारांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या, त्यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे” असा घणाघाती आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. सरनाईक कुटुंबाच्या घर, कार्यालयांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर प्रताप सरनाईक परदेशातून मुंबईत परतले. सरनाईक यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांना ताब्यात घेऊन कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी सुरु केली आहे.

“हे फक्त राजकीय प्रकरण आहे. शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या. एका चॅनलविरोधात असो किंवा अन्वय नाईक प्रकरण असो, त्यामुळे काही जणांच्या पोटात ही मळमळ-जळजळ सुरु असावी. विरोधी पक्षाच्या आमदार-खासदारांची दडपशाही करण्याचा प्रयत्न असेल. पण आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“हे प्रकरण त्यांनाही माहिती नाही. काही न करता असे 40-50 लोक दिल्लीतून येतात आणि त्यांच्या मुलाला घेऊन जातात. फौजफाटा घेऊन येतात, ही झुंडशाही असून, यंत्रणेद्वारे आणीबाणी लावण्याचा प्रकार आहे. लहान सहान त्रुटी असतील चौकशी होऊ शकते. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. ज्याच्या लहान मुलाला ईडी घेऊन गेले त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसणार नाही का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. संजय राऊत, त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्यासोबत प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील ‘सामना’ कार्यालयात दीड तास चर्चा केली. (Sanjay Raut reacts after meeting Shivsena MLA Pratap Sarnaik raids by ED)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment