मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वात शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना मोजक्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छामंध्ये कमालीची कृतज्ञता पाहायला मिळली.
संजय राऊत ट्विटवर शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, ” ‘साहेब, तुम्ही होता म्हणूनी…’ इतकंच राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पवारांसोबतचा एक फोटोही ट्वीट केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीचे ‘आधारस्तंभ’ असं संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो,’ अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
साहेब,
तुम्ही होता म्हणूनी…
देशाचे नेते आदरणीय @PawarSpeaks
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/g9x17RthNg— Sanjay Raut (@rautsanjay61) December 12, 2020
याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खास फोटो ट्वीट केला आहे. ‘हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं अजितदादांनी म्हटलं आहे. ‘साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं,’ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुरोगामी विचारांस नमन, असं म्हणत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘शरद पवार ही केवळ एक व्यक्ती नाही. तो एक विचार आहे, एक विद्यापीठ आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तर, धनंजय मुंडे यांनी देखील पवारांचं अभिष्टचिंतन केलं आहे.
महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. @PawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना. pic.twitter.com/5B8Sfts46e
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 12, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’