Tuesday, March 21, 2023

शिवसेना नेत्याची गोळ्या घालून हत्या; हल्ल्यात पत्नी व मुलगीही जखमी

- Advertisement -

इंदौर । मध्य प्रदेशातील इंदौर शहरात शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची खबळजनक घटना घडली आहे. रमेश साहू असं या शिवसेना नेत्याचं असून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला यांत ते जागीच मरण पावले. हल्लेखोरांच्या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशातील नेते असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. या ढाब्यावरच साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच मरण पावले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली.

- Advertisement -

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं. पाहणी केली. तसेच चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नसून, आरोपी केवळ साहू यांची हत्या करून फरार झाले. त्यामुळे या हत्येमागे जुना वाद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

इंदौर : शिवसेना नेता रमेश साहू की गोली मारकर हत्या, जांच में जुटी पुलिस –  24 Ghante Online | Latest Hindi News

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.