डीसले गुरुजींचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करा! शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डीसले गुरुजी यांना यंदाचा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार जाहीर झाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून डीसले गुरुजी यांच्यावर महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डीसले गुरुजी यांच्या घरी त्यांचा सत्कार करणाऱ्यांची रीघ लागली आहे. अशातच शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले यांनी डीसले गुरुजी यांना राज्य सरकारने राज्यातील सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करावे अशी मागणी केली आहे. आकांक्षा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

”ज्या पोपटराव पवार यांना घेऊन हिवरे बाजारच्या धर्तीवर आदर्श गावं संकल्पना संपूर्ण राज्यभर तत्कालीन आघाडी सरकारने राबवली. त्याचं धर्तीवर ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार मिळवणारे गुरुजी रणजितसिंह डीसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने ‘शिक्षण सुधारणा समिती गटित’ करून प्रत्येक वर्षी 1000 शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून पालकांचा खाजगी शिक्षण संस्थाकडील कल कमी होईल आणि सोबतच सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल” अशी सूचना आकांक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

त्याचंबरोबर हा पुरस्कार मिळवणारे ते हिंदुस्तानातील पहिले शिक्षक ठरले आहेत. भारतातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले गेले परंतू ह्याच्या हि पलिकडे जाऊन अश्या माणसांना राज्य सरकारने राज्यातील सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. गुरुजी डीसले यांना पुरस्कार देऊन आपण फक्त एका व्यक्तीचा सत्कार करणार नसून प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान करणार आहात.” असं आकांक्षाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

Leave a Comment