हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या ईडीच्या छाप्यामुळं चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. ‘पाकिस्तानी क्रेडिट कार्ड संबंधी कंगनानं केलेल्या ट्वीटमुळं माझी बदनामी झाली आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे ट्विट कंगना रानौत हिने केले होते. त्यामुळे देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली. माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या असं काही जाहीर केलं नव्हतं. माझ्या घरावरील छाप्यातही तसं काही आढळून आलं नव्हतं. असं असतानाही माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी करण्याकरता कंगनानं हे ट्वीट केलं. त्यातून देशभरात माझी बदनामी झाली. त्यामुळं अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांच्या व कंगनाच्या विरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे,’ असं सरनाईक म्हणाले.
याबाबत मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी विनंती मी सभागृहाला केली आहे. खोटे ट्विट करणाऱ्या कंगनाला शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणीही महाराष्ट्राची बदनामी करणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांजवळ ‘या’ अर्जाची पोचपावती असणे गरजेची; राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/3v4efUK3SF#HelloMaharashtra #ग्रामपंचायतनिवडणूक— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
लाडक्या बहिणीसाठी भावाने पाठवले चक्क हेलिकॉप्टर; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे परिवाराने केलं जंगी स्वागत
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/7gv4nPEFaC#HelloMaharashtra #viralnews #viralphoto— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
हे सरकार धनगर विरोधी!'; पडळकरांचे विधिमंडळाबाहेर धनगरी वेषात ढोल वाजवत आंदोलन
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/X2IZB6u1yI@GopichandP_MLC @BJP4Maharashtra @ShivSena @CMOMaharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’