हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली असली तरी स्थानिक पातळीवर अजूनही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते म्हणावे तसे एकत्र दिसत नाहीत याचाच प्रत्यय परभणी येथे आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून झालेल्या वादातून शिवसेना खासदार संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू असं खळबळजनक विधान त्यांनी केलं.
संजय जाधव म्हणाले, जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते. राष्ट्रवादीला आम्ही कधीही पायाखाली घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. प्रत्येक गोष्टीत आम्हाला खाजवाखाजवी सुरु आहे असा आरोप त्यांनी केला.
काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढे रान पेटवले जसे काही मोठा अपराध केला. “आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून”, अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे अशी टीका संजय जाधव यांनी केली.