‘ही’ बाब मनाला खूप वेदना देते.. म्हणतं शिवसेनेच्या संजय जाधवांनी दिला खासदारकीचा राजीनामा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज अचानक शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिल्याने परभणीतून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणात भूकंप झालायं. हे सर्व स्थानिक पातळीवरील आघाडील मित्र पक्षांना केलेल्या सहकार्यामुळे घडले असुन स्वपक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत खासदारांनी हे नाटकीय घडामोडीचे पाऊल व शस्त्र काढले आहे. परभणीचे शिवसेनेच्या बाल्लेकिल्यातील खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याची बातमी येताच राजकिय खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या राजीनामापत्रातील कारणे समोर आली आहेत.

ज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांना दिलेल्या राजीनामा पत्रात खा. जाधव लिहीतात कि, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील ८-१० महिन्यापासून आपल्याकडे पाठपुरावा रीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकत्यांचा हिरमोड झाला, त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकत्यांची कशी-बशी समजूत काढून तथा मी ही संयम बाळगून शांत बसलो. असे नमुद करत दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच प्रशासक मंडळ नियुक्त केले . ही बाब माझ्या मनाला फारच खाटकल्ली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.

आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकत्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेन तर खासदार पदावर राहण्याचा मला मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते. शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे . तेव्हा कार्यकाला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची ? खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही . या मताचा मी आहे . शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल ? असा प्रश्न पक्षप्रमुखाना विचारत पुढे ते लिहीतात,जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवका यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणतं काय न्याय देऊ शकेल? असा प्रश्न मला पडला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करूनही दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन : अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाना अत्यंत वेदना देत आहे. खासदार म्हणून मी जर कार्यकत्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांनी व राजीखुशीने मी खासदार पदाचा राजिनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेल, तरी माझा खासदारकीचा राजिनामा मंजूर करावा, ही विनंती. अशी शेवटी भावनीक साद ही दिलीयं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”