व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भक्तांना आणि चमच्याना इतके मानसिक बळ येते कुठून; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात अन् फक्त 2 तास झोपतात अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मोदींची 2 तासाची झोपही उडालेली असेल अस म्हणत भक्तांना आणि चमच्याना हे इतके मानसिक बळ येते कुठून अस म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणतात, आज मोदी भक्तांनी मोदी इज इंडिया’ असे जाहीर केले. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असे टोक भक्तांनी गाठली पण आता कडेलोट केलाय तो महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, “श्री. नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.” पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्याना हे बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.

रशिया युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान मोदी यांना कसे ओढायचे यावर भक्त मंडळीत प्रचंड खल झाला असावा. शेवटी एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर बातम्या झळकल्याच. मोदी यांनी पुतीन व बायडेनशी तब्बल एक तास चर्चा केली. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी फोन करून मोदींकडे मदत मागितली. मोदी यांनी म्हणे पुतीन व बायडेन यांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला. मोदी यांचा सल्ला दोघांनी मानल्याचेही प्रसारित झाले, पण सत्य असे की, पुतीन यांनी युक्रेन पूर्ण बेचिराख केले आहे. पुतीन व बायडेन हे मोदींच्या ऐकण्यातले होते, मग दोघांत युद्ध का पेटले? यावर भक्त व चमच्यांचे म्हणणे असे की, “युद्धाला तोंड फुटले तेव्हा मोदी हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे त्या दोघांचा मोदींशी संपर्क होऊ शकला नाही!” ही सरळ सरळ चमचेगिरी आहे असे राऊत यांनी म्हंटल.