देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती, तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात यावे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. राऊत यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!”

दरम्यान देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

You might also like