हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वैर दिवसेंदिवस वाढतच असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुप्त भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्यात आपल्याला पक्षाचा प्रचार करायला आलेल्या दोन्ही नेत्यांनी गुप्त भेट घेताच चर्चाना उधाण आले आहे.
पणजीमधील मँरिएट हाँटेलमध्ये केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत मात्र सविस्तर समजू शकले नाही.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सध्या ईडी च्या रडारावर आहेत. त्यावरून राऊत हे आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर सूडाच्या राजकारणाचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच ईडी कार्यालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी उघड करणार आहे असेही त्यांनी म्हंटल आहे.