पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली.

तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भारतानं जंगजंग पछाडलं. पण बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ देत, पण ममतादीदींचं धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. असेही राऊत म्हणाले.

भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment