Wednesday, February 8, 2023

भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत होतो पण गुलामासारखी वागणूक मिळत होती – संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. एकीकडे- ठाकरे- मोदी भेटीमुळे शिवसेना भाजपचे सुर जुळणार का याची चर्चा सुरू असतानाच राऊत यांनी बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजप कडून नेमकं काय प्रत्युत्तर येणार हे पाहायला हवे.

संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, अस राऊत यांनी म्हंटल.

- Advertisement -

यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल देखील भाष्य केले. राऊत म्हणाले, प्रशांत किशोर हे प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार आहेत. जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल पण पवारांची भेट ही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.