हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन जोरदार टीका केली आहे. तुम्हाला जर सुबुद्धी आली असती तर शिवसेनेसोबतची मैत्री जपली असती आणि कदाचित तुम्ही मुख्यमंत्री झाला असता असा चिमटा त्यांनी काढला. संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
नागपूर येथील जाहीर सभेत राऊत म्हणाले, नागपूरच्या मातीत राहूनही दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्यांच्या सोबत मैत्रीच्या नात्याने राहिलो पाहिजे अशी सुबुद्धी तुम्हाला त्यावेळी आली असती तर कदाचित आज आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिला असता. मात्र, तुम्हाला तेव्हा दुर्बुद्धी सुचली असे संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांना सुबुद्धीचं अजीर्ण झाल्यामुळे थोडी सुबुद्धी जर महाराष्ट्रात त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र शांत राहील. असे संजय राऊत म्हणाले. नागपूरकरांचं आमच्यावर प्रेम वाढत चाललय. बरेचसे नागपूरकर हल्ली मुंबईत असतात, त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला.” असंही राऊत म्हणाले.