राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये; राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये असा टोला राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, राज्यपाल अभ्यासू आहेत. विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचं आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचं आरोग्य खातं उपचार करायला सक्षम आहे, अशा शब्दांत राऊतांनी राज्यपालांचा समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले, घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. त्यामुळे त्यांनी जास्त अभ्यास करू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Leave a Comment