सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली; पोलीस तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये गेले असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर केला, या घटनेत सोमय्या जखमी झाले असून त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे , त्यानंतर आता शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांच्याविरोधात उलट तक्रार दखल करण्यात आली असून सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप करण्यात आला आहे

शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत तक्रार केली असून कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला नाही, उलट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजप मधील वाद विकोपाला गेला आहे , २ दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कांबोज हे मातोश्रीबाहेर गेले असता त्यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हालला करण्याचा प्रयत्न केला होता. मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी मातोश्रीबाहेर आले होते असा आरोप तेव्हा शिवसेनेने केला होता. या एकूण संपूर्ण प्रकरणानंतर भाजपही आक्रमक झाली आहे त्यामुळे आगामी काळात अजून मोठ्या प्रमाणात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळू शकतो