शिवसैनिक गद्दार म्हणतील याची शिंदे गटातील ‘या’ नेत्यांना अजूनही भिती? कमेंट बाॅक्स बंदच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल 40 शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरी मुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द उद्धव ठाकरेंचेच मुख्यमंत्रीपद गेल्याने राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे.

शिवसैनिकांच्या टीकेला आणि रोषाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून शिंदे गटात असणारे महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन काही मंत्र्यांनी सोशल मीडियावरील आपल्या अकाउंट खालील कॉमेंट बोक्स बंद केलेलं आहे. यामध्ये खुद्द राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई, दिग्गज शिवसेना नेते म्हणून ओळखले जाणारे जळगावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. शिवसैनिक गद्दार म्हणतील, किंवा ट्रोल करतील या भीतीने सदर आमदारांनी सोशल मीडियावरील कॉमेंट बोक्स बंद केल्याची चर्चा आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत झालेलं हे सर्वात मोठे बंड ठरलं. आत्तापर्यंत नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता मात्र त्यावेळी शिवसेनेला जास्त फटका बसला नव्हता. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला मोठं खिंडार पडले. आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Leave a Comment