अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर..; संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून आता त्यांनी भाजप नेते संजय कुटे यांच्यावर तोफ डागली आहे. संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन संजय गायकवाड यांनी केले.

वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

सर्व भारतातील लोक एका पक्षातील आहेत का? यात सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक आहेत. मग या राज्यात केवळ मुख्यमंत्री आपला नाही, म्हणून अडवणूक करता. पाकिस्तान, बांगलादेश यांना पुरवता. पण भारताला पुरवत नाही. उत्तरप्रदेशात तुम्ही रेमडेसिव्हीर फुकट वाटता. पण महाराष्ट्राला जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

Leave a Comment