देशाला कायदा देणाऱ्यांच्या वारसदारांनी कायदे भंगाची भाषा करणं योग्य नाही; प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । प्रकाश आंबेडकरांनी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली. त्यांचं ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदे भंगाची किंवा नियम भंगाची भाषा करणं हे म्हणजे लोकांना हुसकवण्या सारखं आहे’ अशी टीका राऊत यांनी केली.

‘आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रकारे गर्दी जमवली आहे. ती रेटारेटी सुरु आहे. हे चित्र चांगलं नाही. पंढरपुरच्या विठोबाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेला आहे. फक्त बाहेर आंदोलक आहेत ते नाहीत. कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. हजारो लोकं जमले आहेत ज्यामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

‘आम्ही नियम मोडण्यासाठी आलेलो आहेत. असं म्हटलं जात आहे. प्रकाश आंबेडकर हे एक संयमी नेते आहे. ते कायद्याचे अभ्यासक आणि जाणकार आहेत. ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली. त्यांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदे भंगाची किंवा नियम भंगाची भाषा करणं हे म्हणजे लोकांना हुसकवण्या सारखं आहे. तरी मला खात्री आहे. यावर मुख्यमंत्री आणि विरोधक मार्ग काढतील.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment