काँग्रेस अंतर्गत वादाचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस पक्ष हा देशातील सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. मी त्या विचारांचा जरी नसलो तरी देशातील एक मजबूत विरोधी पक्ष टिकला पाहिजे.तरच या देशातील संसदीय लोकशाही अणि स्वातंत्र्य टिकेल,असंही संजय राऊत म्हणाले.काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे, असंही राउत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिर आंदोलन, सुशांत प्रकरण, काँग्रेसमधील वादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

संजय राऊत म्हणाले की, मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, असे राऊत म्हणाले. मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment