संजय राऊत यांनी साधला कंगनावर निशाणा ; सरकारला केली कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांवर आरोप करणारी अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला एक मागणीही केली आहे.

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको ” असंही कंगना म्हणाली होती.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी  उत्तर दिलं आहे. “जर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती राहत असेल आणि ती जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. अशा वेळी मी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही तिथं राहता, खाता, तिथं कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाहीये. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत. आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment