जय श्रीराम म्हंटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही – संजय राऊतांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जय श्रीराम हा काही राजकीय शब्द नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. जय श्रीराम ऐकायला व म्हणायला या देशात कुणलाही त्रास झालाच नाही पाहिजे. श्रीराम या देशाची अस्मिता आहे, आधार आहेत. असं आम्ही मानतो. जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही. मला संपूर्ण विश्वास आहे, ममता बॅनर्जी देखील प्रभू श्रीरामावर श्रद्धा ठेवतात.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

पश्चिम बंगाल येथील कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करत असताना उपस्थित लोकांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ममतांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम ऐकण्यास व बोलण्यास त्रास होत असल्याचं भाजपाचं म्हणणं असून, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील विधान केलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण –

कोलकात्ता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीतील एका कार्यक्रमात, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणा अगोदर उपस्थित नागरिकांनी जय श्रीराम..अशा घोषणा दिल्याने, ममता बॅनर्जी प्रचंड संतपाल्या होत्या व त्यांनी भाषण करण्यास नकार देत, जाहीरपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. हा मुद्दा भाजपाकडून उचलून धरण्यात आला असून, जय श्रीराम..घोषणेवरून आता ममता बॅनर्जींवर निशाणा साधला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment