नटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता रस्त्यावर बसून पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत एका नटीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी आमच्या विरोधात उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन मृत झालेल्या पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हाथरसच्या घटनेवरून भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी काही लोकांनी आकांडतांडव केलं होतं. आता त्यांनी हाथरसला जाऊन दलित, शोषित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढवली पाहिजे. जेव्हा दलित, शोषित समाजातील मुलगी आक्रोश करते तेव्हा तिचा आवाज जगापर्यंत पोहोचू नये म्हणून दडपशाही केली जाते, असं सांगतानाच पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की हे अत्यंत दुर्देवी-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं मी पाहिलं. हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रातही अनेक आंदोलने झाली. पण असा प्रकार कधी घडला नाही आणि घडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like