भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू ; राऊतांचा कन्नडिगांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावमधील मराठी माणसावर अन्याय करण्याऱ्या प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार  शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी ते बेळगाव ला गेले असता त्यांनी हे विधान केले.

दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर आहोत. महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.

गडकरींवर साधला निशाणा –

यावेळी राऊतांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, उद्या नितीन गडकरी येत आहे. मराठी माणसाला पाडण्यासाठी ते येत आहेत का? असा सवालही राऊतांनी विचारलाय. तसेच पंतप्रधान मोदी जरी प्रचाराला आले तरी शुभमचा भरधाव घोडा थांबणार नाही. असा दावाही राऊतांनी केलाय.

You might also like